आमची मोटर सायकल वारी चा दिवस २ रा .... किल्ले दर्शन दिवस १ ला.
शुक्रवार २६ डिसेंबर २०१४. वेळ – दुपारी ३ वा . १० मि
आजचा १ ला किल्ला - किल्ले अंतुर पासून कसाबसा काढता पाय घेतला. त्याची मोह माया काही सुटत नव्हती. तरीही आजच्या दिवसात्तल्या २ रया श्रीमंत किल्ल्याच्या ओढीने
मोटारसायकल ला टांग मारली.खोलापूर – नागापूर नंतर गौताळा अभयारण्यातून औट्रम घाटाने
खाली जाणाऱ्या मुख्य रस्त्याने आम्ही आता नागद च्या दिशेने निघालो होतो.....
वाटेवरच या पोराचा फोटू
काढण्याचा मोह योगेश ला आवरता आला नाही......व्वाह ! काय मज्जा !! त्याची स्वारीच निराळी !!.....वाटत होतं कि मोटारसायकल वरून उतरून त्याच्यासारखा आनंद घ्यावा. पण नाईलाज ......
पुढे गेलं कि ....गौताळा अभयारण्याची कमान
....या वाटेने रात्री उशिरा जाणेस बंदी असते अशी माहिती मिळाली.
अधून मधून वानरांच्या
टोळ्याच आम्हाला आडव्या गेल्या.
या चौकातून डावीकडे कन्नड ला आणि उजवीकडे औट्रम घाट उतरून सायगव्हान गावात पोहोचता येते.
या चौकातून डावीकडे कन्नड ला आणि उजवीकडे औट्रम घाट उतरून सायगव्हान गावात पोहोचता येते.
सायगव्हान ओलांडून आम्ही
नागद मध्ये पोहोचलो. चौकशी करून आम्ही लोन्झा
किल्ला अर्थातच महादेव टाका डोंगरासाठी बनोटी रस्त्याने १ कि ..मी.वरील या पाटी पाशी आलो.
वेळ – ५ वा .१५
मि....महादेव टाका डोंगराच्या जवळ तर आलो होतो. पण इथून पुढच्या प्लान बद्दल मनात
काहूर माजलं होतं. त्या पाटी पाशी थांबलो असताना एक स्थानिक व्यक्तीने आमची चौकशी
केली.त्यांना सर्व सांगितले. या माझ्या मागमाग म्हणाले.माताड वाटेनं आम्ही
त्यांच्या मागं निघालो.
पुढं त्यांच्या घराकडे
जाणाऱ्या वाटेपाशी गाडी थांबवली.डोंगराकडे बोट दाखवत म्हणालं, ‘ या कच्च्या वाटेनं शेवटाला जायचं.
तिथं उजवीकड पायऱ्यांची वाट वर जाते.’....
आता काही वेळातच दिवस
संपणार होता .मी म्हटलं, ‘पुढं कुणी वाट दाखवणार भेटल काय ?....आम्हाला किल्ला
बघायचाय आणि परत खाली उतरून माघारी यायचंय. नंतर बनोटी ला जायचंय. म्हंजी उद्या
तिथला सुतोंडा किल्ला पाहणे होईल
‘....
माझ्या पुढच्या नियोजनाचा
त्यांना कळवळा आला. आणि गडी ‘ लगीच सोबतचा
किराणा घरी पोचवून तुम्हाला किल्ला दाखवाया येतू’ म्हणाला......हे पात्र म्हणजे
कन्नड मधल्या त्या ‘ दत्तू सोनावणे ’ ची डुप्लिकेटच.....
पुढल्या १० व्या मिनिटाला माणूस त्यांच्या सोबत २ प्वोरांना घेऊन हज्जर !
वेळ- ६ वा १५ मिनिटे . रेलिंग लावून सुरक्षित
बनवलेल्या पायरी मार्गाने या गडाच्या प्रवेशद्वारात पोहोचलो .
पूर्णपणे उध्वस्त प्रवेशद्वाराचा फक्त पाया दिसून येतो सध्या.
पूर्णपणे उध्वस्त प्रवेशद्वाराचा फक्त पाया दिसून येतो सध्या.
इथून किल्ल्याला डावीकडून
किंवा उजवीकडून जावून पूर्ण वळसा घालून पुन्हा इथे येता येते. डावीकडे गेलं कि कातळकोरीव अशी एक मोठ्ठी गुहा दिसते. या गुहेतल्या महादेवाच्या जागृत देवस्थानामुळे
हा किल्ला स्थानिकांना ‘ महादेव टाका’ म्हणूनच अलीकडच्या काळात जास्त प्रसिद्ध आहे.या गुहेत एक साधू महाराज राहतात.फारशा बसवून विजेचिही सोय
केलि आह
या गुहेच्या शेजारी पिण्याच्या पाण्याचे बारमाही असे ५ खांबी टाके आहे . इथे पायरया बनवून खाली उतरने सोप्प केले आहे आम्ही वेळेअभावी इकडे पुढे जावून नागद गावाकडे उतरणारा कातळकोरीव पायरयांचा मार्ग पाहणे रद्द केले. पुन्हा मागे आलो अणि उजव्या बाजूने पुढे जाताना थोडखालच्या बाजूला तटबंदीत असलेला किल्ल्याचा चोर दरवाजा शोधण्याचा निष्फल प्रयत्न करू झाला.परंतु आता अंधार पडायची चिन्हे दिसत असल्याने आम्ही थोडं घाईने या श्रीमंत किल्ल्याची किल्ल्याची फेरी मारीत निघालो.
तसेच वरती किल्ल्याच्या माथ्याला
पोहोचलो. तिथे इमारतींचे अवशेष ,चौथरे दिसून आले .
माथ्यावरती असलेली मारुती
रायाची मूर्ती
एव्हाना अंधार पसरला होता . आम्ही ६ वा. ४० मिनिटांनी किल्ला
उतरून खाली आलो. खाली गाड्यांजवळ आलो तेव्हा
पुढच्या गावाला न जाता आमच्या घरीच आज राहा अशी आग्रहाची विनंती त्या पोरांनी
केली.अन आम्ही पेचात पडलो. कारण इथून पुढच्या किल्ल्याच्या जवळ आज पोचलो तर
उद्याच्या किल्ल्याच्या भटकंतीला भरपूर वेळ मिळेल.असं आमचं नियोजन. ती पोरं काही
ऐकेचनात. त्यांचा पाहुणचार नाकारणे अवघड जात होते. पण कसबसं त्यांना समजावलं. आणि
तिथनं निघालो. हि अशी एक एक माणसे
भेटत्यात बघा भटकताना ......
नागद – बनोटी रस्त्याने
बनोटी ला निघालो. रस्ता खराबच आहे. मध्येच वाटेवर एक स्कूल बस
थांबलेली दिसली. पुन्हा मागं वळून आलो. तर गाडीचा ड्रायव्हर बस चे पंचर चाकं
बदलण्याची कसरत करीत होता ..अन तोही एकटाच !
गाडीत बालवाडी अन १ ली, २ री ची चिमुकली पोरं बसून होती. माहिती अशी कि , ह्या मुलांची सहल गेली होती. पण माघारी येताना मुलांच्या म्याडम लोकं उतरुली मागच्या गावात ...हि पोरं घरी पोहोचवायची जबाबदारी एकट्या ड्रायव्हर वर टाकून .....काय म्हणावं आता !

आम्ही टोर्च दाखवून त्याला
मदत केली. आणि काही वेळाने पुन्हा मार्गस्थ झालो.
बनोटी गावात पोहोचलो.
एव्हाना गावात शांतता झाली होती. शेकोटी पेटवून चौकाचौकात मानसं गप्पा हाणत होती.
आमचे अवतार पाहून ‘ मिल्ट्री वाले’ , ‘एस पी आर एफ ' अस म्हणत बाजून गोळा झाली.
आम्ही मिळालेल्या माहितीनुसार अमृतेश्वर मंदिर कुठाय ते विचारलं आणि आमची भटकंती
वगैरे सगळं त्या मंडळींना सांगितलं.
अमृतेश्वर मंदिराच्या आवारात उघड्यावर मुक्काम
करावा लागणार होता. जो मोठ्ठा हॉल आहे तो बंदिस्त नाही . आणि आजूबाजूने शेती
आहे.त्यामुळे आम्ही माघारी गावात आलो. पुन्हा चौकात आलो. तिथल्या मंडळींना आमची
मुक्कामाची काही सोय होईल का विचारलं . त्यांच्यातल्या बापू चौधरी नावाच्या
तरुणाने लागलीच ग्रामपंचायत ऑफिस ची चावी मागून घेतली.अन चला म्हटले....मला पुन्हा
‘कन्नड चे दत्तू सोनावणे’ ची आठवण झाली. त्या दत्तू सोनावणे चा हा ‘बाप्पू
चौधरी’ आजचा हा ३ रा अवतार जो आमच्या
मदतीला धावून आला.
वेळ – रात्री ९ वा .५० मि. ........आमच्या सोबत
समस्त गावकरी ग्रामपंचायत ऑफिस ला दाखल झाले.आमच्या मोटारसायकल वरील मोठ्ठाल्या ब्यागा , पुण्याहून आलेली लोकं
अन तेही किल्ले बघाया हे सारं मोठ्ठ कौतुकाच वाटत होतं त्यांना.
गाडीला बांधलेल्या ब्यागा सोडून आतमधी घेऊन आम्ही आता पोटोबाची सोय कराया घेतली. त्याचसोबत हजर
असलेल्या गावकऱ्यांच्या सोबत गप्पाही चालू होत्या.त्यांना आमचा भटकंतीच सर्व
नियोजन सांगितलं. आमच्या कडील माहितीचे
फाईल अन पुस्तक इ.टी लोकही चाळू लागली.
नंतर सव्वा अकरा ला झोपी गेलो. पुढच्या
दिवशीच्या किल्ले सुतोंडा चे वेध मनाला लागले होते. पण काही वेळातच
दिवसभरच्या धावपळीने झटकन झोप लागली.
शनिवार २७ डिसेंबर २०१४..... दिवस ३ रा
...किल्ला ३ रा ....
खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या
सोबत घेऊन बाकी सगळे सामान तिथेचठेवून आम्ही ६ : ४५ वाजता नायगाव च्या दिशेने कूच केलं. कच्च्या रस्त्याने नायगाव मध्ये पोहोचल्यावर
तिथून पुढची सरळ गडाकडे जाणारी वाट
विचारून घेतली .पुढे वाटेवर डावीकडे एक ओट्यावर हनुमानाची मूर्ती दिसली.
सरळ पुढे जात नंतर समोर
सुतोंडा किल्ल्याचा डोंगर दिसतो त्याच्या डावीकडून शेताकडेने
वळसा घालत आम्ही एका तलावाच्या बाजूने शेतात पोचलो.
पडवी वजा झोपड्या जवळ जाऊन तिथं उभ्या गाववाल्याला गडाची वाट विचारली. बोलता बोलता त्यालाच वाट दाखवायला येण्याची विनंती केली. तो तिथल्या शेतावर कामासाठी आला होता.
तरीबी आमच्या साठी लगीच निघालं सोबतीला. किल्ला दाखवायला. तिथच गाडी उभी केली. लागलीच किल्ल्यावर जाणारी पायवाट पकडली. झाडाझुडूपांतून वर जात होतो.

आमच्या समोर उजवीकडे सुतोंडा किल्ला आणि डावीकडे
रक्ताई चा डोंगराची रांग दिसते आहे. या दोहोच्या मध्ये निघणाऱ्या खिंडीच्या दिशेने
आम्ही वर पोहोचलो.
अचानक समोर पाहिलं तर
....इतका वेळ डोक्यात घोळणार..... सुतोंडा
किल्ल्याचं कातळात कोरलेले १२ -१३ फुट उंच
पश्चिमाभिमुखी प्रवेशद्वार !!....
डोंगर फोडून त्यातच खंदक बनवलेला ,ही मानव निर्मित अशी खिंड .... उजवीकड वरती तटबंदी ची रचना केलेली .तसेच त्यात डाव्या बाजूला एक शरभ शिल्प ही दिसते.आणि या दरवाजातून कातळातून खोदलेल्या भुयारी मार्गाने किल्ल्यात प्रवेश ....काय विलक्षण !!

येथून दरवाजातून समोर
आत गेलं कि बांधकामांचे अवशेष दिसतात. डावीकडे थोड़े पुढे गेलो की किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार , उध्वस्त स्थितीत
दिसते. इथून आत गेल की २ सुकलेली टाकी अणि मग हे १३ तुटलेले खांब असे पिण्यालायक
असे टाक आढळते.
इथून डावीकडे चालत गेलो
तर मोठमोठाल्या लेण्यांसारखे पाण्याची
कित्येक खांब असणारी टाकी पार वेड लावून
टाकत होती. म्हणता म्हणता अशी तीस एक टाकी बघून झाली. एक से बढकर एक अशी टाक्यांची
मालिकाच जणू !
.... इथून पुन्हा मागे येवून उजव्या अंगाने किल्ल्याला वळसा घालायला निघालो. या बाजूनेही तशीच मोठ्ठाली कोरीव टाकी .... पडक्या बांधकामांचे काही अवशेष ....
.... इथून पुन्हा मागे येवून उजव्या अंगाने किल्ल्याला वळसा घालायला निघालो. या बाजूनेही तशीच मोठ्ठाली कोरीव टाकी .... पडक्या बांधकामांचे काही अवशेष ....
तसेच किल्ल्याची तटबंदी हि आढळून येते. पुढे एके
ठिकाणी वरील प्रमाणे मशिदिचे उध्वस्त असे द्वार हि दिसून आले. इथे जवळ किल्ल्याचे
सर्वोच्च ठिकाण आहे.
त्या टाक्यांपासून थोडं पुढे खालच्या बाजूला उतरलं की किल्ल्याचा चोर दरवाजा लागतो. जो नायगाव चे दिशेला खाली उतरतो.त्याच दरवाजा शेजारी पडलेले एक
शिल्प..
एव्हाना आमच्या यादीनुसार या किल्ल्यावरील सर्व स्थळ बघून झाली होती. संपूर्ण पणे किल्ला
बघून घेतल्याचं सुख आता जाणवत होतं.
आमचे वाटाड्या म्हणून आलेले
श्री हिरामण चोरमल यांनीही तितक्याच
आपुलकीने आम्हाला या किल्ल्याची श्रीमंती दाखवायला कसलीही कसूर ठेवली नाही. हे जणू आजच्या दिवसातले १ ले असे ‘ दत्तु सोनावणे ’ चे एक
रूप !!
आता शेवटी जाता जाता बोनस
म्हणून हिरामण रावांनी आम्हाला चोर दरवाजाने खाली उतरून डोंगराच्या पोटातली
जोगणामाई चे घरटे म्हटली जाणारी लेणी दाखवणेचेही कष्ट घेतलेच ....तिथं
पोहोचायला झाडझूडूपांतून वाट काढीत आम्ही
पोहोचलो. आणि एव्हडे कष्ट घेतल्याचे सार्थक वाटले.
हेच ते जोगणमाई चे घरटे
अथवा लेण...हे एक जैन लेणी असून इथे कधी मधि जैन लोक येतात अशी माहिती हिरामण
रावांनी दिली. बाकि इतर वेळी कुणीच फिरकत नाही.
बाहेर च्या दालनाला २ कोरीव खांब असून आत गेल की उजवीकडे मांडीवर मूल घेउन बसलेली अशी एक स्त्री ची मूर्ति आहे. अणि डाव्या बाजूला भिंतीवर महावीरांची प्रतिमा कोरलेली दिसून येते.
बाहेर च्या दालनाला २ कोरीव खांब असून आत गेल की उजवीकडे मांडीवर मूल घेउन बसलेली अशी एक स्त्री ची मूर्ति आहे. अणि डाव्या बाजूला भिंतीवर महावीरांची प्रतिमा कोरलेली दिसून येते.
आतले चौकोनी आकाराचे दालन
..त्यात कसलीही मूर्ति कोरीवकाम दिसून येत नाही.
या लेण्यातुन बाहेर आलो.
हिरामण रावांना इथ जवळ असणारी अजुन दूसरी लेणी कुठे विचारताच स्वारी झुड़ूपातुन
वाट काढीत पुढे निघाली. अणि ४ थ्या मिनिटात आम्ही त्या २ रया लेणी पाशी . .
बाहेर २ खांब कोरीव अन आत उजवीकडे बसायला दगडी बाकाची रचना ..आणि बाकी थोड खोल खोल टाक्या सारख कोरीवकाम.
ही लेणी पहायची तर एखादा स्थानिक महित्गर सोबत असने खुप गरजेचे .
बाहेर २ खांब कोरीव अन आत उजवीकडे बसायला दगडी बाकाची रचना ..आणि बाकी थोड खोल खोल टाक्या सारख कोरीवकाम.
ही लेणी पहायची तर एखादा स्थानिक महित्गर सोबत असने खुप गरजेचे .
हे सर्व बघून आम्ही वाट
बनवत झाडा झुडुपातुन डोंगराच्या नायगाव कडील बाजुस पोहोचलो.....चालत गप्पा मारित
हिरामण रावांचे करावे तितके कौतुक कमीच
असून देखिल ते करीतच त्यांच्या झोपड़ी पाशी आलो. त्यांचे मनोमन आभार मानले. अणि
मोटर सायकलला किक मारली.
वेळ – १० वा. ३० मि..... मागील तब्बल अडीच तास
लोटला होता - किल्ला चढ़ाई , फेरी आणि उतराई
हे सर्व मनसोक्तपणे पूर्ण झाले होते ....पाठमोर बघत या असाधारण असा सुतोंडा
किल्ला नजरेत सामावून घेतच आम्ही नायगाव
कड़े जाणारी परतीची वाट धरली. दगडा
मातीच्या वाटेने नायगावमधी पोहोचलो.इथे गावात रस्त्या चे बाजूला ठेवलेली ही
विष्णुमुर्ती पाहणे म्हणजे आजचा डब्बल बोनस !!
गावकरी कुतुहलाने जमा
झालेले चौकशी करीत होते.आमची हौस एकून
सगलेच लई खुश झाले.त्यातच दुधात साखर म्हणजे एक उत्साही गावकरयाने चला माज्या मागे म्हणत ........शेतातल्या वाटेने चालत
एका मोठ्या प्राचीन बारव पाशी नेल. चौकोनी
आकाराची , भिंती ढासळलेली , चारही बाजूंना प्रवेशद्वार आहेत तसेच अनेक कोरीव शिल्प दिसून आली.
सध्या गावातल्या लेकी सुना इथे धूण कराया वापर करतात.गाव वाल्या लोकांना थोड बारवेच्या जतन करण्या बद्दल विनंती केली....आभार मानले . आणि आमच्या सारखच भटकंतिला येणारे हौशी लोकांना ही बारव आवर्जुन दाखवा म्हणून आग्रह सुद्धा केला .योगेशने आजी सोबत फोटू काढायला सांगितलं आणि मी नाही म्हटलं असा कधी होत नाही .

ही बारव पहायली मिळण म्हणजे
आजचा २ रा बोनस !
गाडीला टांग मारून बनोटी
गावाला निघालो. तिथे समस्त गावकरी आमची वाट बघत होते. कारण ग्राम पंचायत ऑफिस ची
किल्ली आतमध्ये सामान ठेवून आम्ही सोबत. नेलेली होती. ११: ३० वाजता तिथे पोचलो.
ऑफिस उघडून आम्ही ब्यागा बाहेर काढल्या. बैग्स आवरून गाडीला बांधून टाकली.आता जाम भूक लागली होती. पण तसा वेळ नव्हता झालेला.
त्यामुळ आम्ही पुढल्या किल्ल्यासाठी मार्गस्थ होणे चे ठरवले.
आम्हाला इथे रात्री मुक्कामाची सोय ज्यांनी करुन दिली असे श्री.
बाप्पू साहेब चौधरी अणि इतर प्रेमळ गावकरी .....सर्वांचे आभार मानले. अशी मदत करणारी, पाहुण्यांचा असा
पाहुणचार करणारी अशीच माणस नेहमी भटकताना
भेटत्यात !! त्यामुळ कधीच कशाची फिकिर वाटत नाही.
भले मग आपण कुठल्याही प्रदेशात भटकायला जावे .....आणि ही तर या “ श्रीमंत
किल्ल्यांच्या प्रदेशातली – श्रीमंत मनाची माणस ”.....
अपूर्ण !
ठळक वैशिष्ठ्ये -- संभाजीनगर (औरंगाबाद ) परिसरातील भटकंती तील २ रा आणि ३ रा किल्ला भ्रमंती - ---दिवस २ रा अणि ३ रा --- मोटरसायकल प्रवास – अंतुर किल्ला – नागापुर -- गौताळा अभयारण्यातून औट्रम घाटाने –नागद गाव – महादेव टाका फाटा अर्थात ‘लोंझा किल्ला’ –पुन्हा माघारी फाटा – नागद बनोटी रस्त्याने – बनोटी गाव –मुक्काम – बनोटी गाव – कच्च्या रस्त्याने नायगाव – शेतातल्या वाटेने सुतोंडा किल्ला – नंतर पुन्हा माघारी –नायगाव मार्गे – बनोटी गाव .-आणि पुढच्या किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ .
उर्वरित घटना क्रम - ४ था आणि ५ वा किल्ला दर्शन वृन्त्तांत पुढील ब्लॉग मध्ये ..... ब्लॉग भाग -३ रा "आमची मोटारसायकल वारी .......श्रीमंत किल्ल्यांच्या दारी ! भाग - ३ " ....लिंक --http://rajjeshjadhav.blogspot.in/2015/05/blog-post_11.html
या अगोदरच्या भाग १ ला साठी लिंक --http://rajjeshjadhav.blogspot.in/2015/04/blog-post.html

खुप छान. वाचताना अस वाटल की मी पण तुमच्याबरोबर आहे.
ReplyDeleteमस्तच
ReplyDelete